गोठ्याला लागलेल्या आगीत सात जनावरे जळून खाक

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 8 एप्रिल 2019

नांदेड : शेतावरील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत चार मुर्रा म्हैस, तीन वगारं, एक कुत्रा आणि शेजारीच असलेली दोन हजार कडब्याची गंजी जळून खाक झाली. ही घटना मरळक (खु.) येथे रविवारी (ता. 7) रात्री घडली. 

नांदेड तालुक्यातील मरळक (खु.) येतील शेतकरी गोविंद किशन कदम यांचे गावशेजारी शेतीत गोठा आहे. त्या गोठ्यावर ते आपली जनावरे बांधून घरी जातात. रविवारी सायंकाळी त्यी आपल्या गाेठ्यात असलेल्या चार मुर्रा म्हैस, तीन वगार, एक पाळीव कुत्रा यांना चारापाणी करून ते घरी गेले.

मध्यरात्री अचानक या गोठ्याला आग लागली. यात बांधलेली सर्व जनावरे जळून खाक झाले. एवढेच नाही तर गोठ्याच्या शेजारीच असलेल्या कडब्याच्या गंजीलाही आगीने आपल्या कवेत घेतले. जवळपास दोन हजार कडब्याच्या पेंड्या यात जळून राख झाल्या. ही माहिती सोमवारी (ता. 8) सकाळी शेतकरी कदम हे दूध काढण्यासाठी शेताकडे गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जवळपास सात लाख रुपयाची नुकसान झालेल्या कदम यांना धक्का बसला. त्यांनी लगेच लिंबगाव पोलिसांना ही माहिती दिली. बीट हवालदार हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी आले. त्यांनी मृत जनावराचे पंचनामे केले. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात जळीत प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: 7 animals died in fire at nanded