फॉरेन्सिक लॅबच्या इमारतीस मिळाले 9 कोटी

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 2 जून 2018

गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोचविण्यासाठी पोलिस व न्यायदानातील महत्वाचा दुवा म्हणून फॉरेन्सिक लॅब काम करते. येथील ही लॅब सध्या तत्कालीन कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत मागील चार वर्षांपासून सुरू आहे.

नांदेड : येथील विभागीय प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) इमारात बांधकामासाठी गृहविभागाने 9 कोटींचा निधी गृहनिर्माण विभागाच्या खात्यात वर्ग केला. एवढेच नाहीतर या इमारतीचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याची माहिती सहाय्यक संचालक संदीप चट्टे यांनी दिली. 

गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोचविण्यासाठी पोलिस व न्यायदानातील महत्वाचा दुवा म्हणून फॉरेन्सिक लॅब काम करते. येथील ही लॅब सध्या तत्कालीन कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत मागील चार वर्षांपासून सुरू आहे. परंतु शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर या कार्यालयाला स्वत:ची विष्णूपुरी परिसरात तीन एकर जागा मिळाली. या जागेवर आता आधुनिक पध्दतीने सर्व सोयीयुक्त सुसज्ज अशी इमारत तयार होणार आहे. यासाठी गृहविभागाने पोलिस गृहनिर्माण संस्थेकडे 9 कोटींचा निधी वर्ग केला आहे.

Web Title: 9 crore for forensic lab building