सव्वाशे केंद्रावर 9 लाख क्विंटल तुरीची खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या तुरीला हमी भाव मिळावा; यासाठी पणन महासंघाकडून नाफेड व भारतीय अन्न महामंडळातर्फे 125 खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत नाफेडच्या केंद्रावर 8 लाख 96 हजार 723; तर भारतीय अन्न महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर 96 हजार 115 अशी 9 लाख 92 हजार 839 क्विंटल तुरीची खरेदी खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीपोटी 54 हजार 688 शेतकऱ्यांना 354.99 कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आल्याची माहिती दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे देण्यात आली. 

केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेंतर्गत आधारभूत दराने राज्यात 15 डिसेंबर 2016 पासून तुरीची खरेदी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या पणन विभागातर्फे पणन महासंघ नाफेड व भारतीय अन्न महामंडळ यांच्यातर्फे तुरीची खरेदी सुरू आहे. याव्यतिरिक्त राज्यामध्ये नाफेड व भारतीय अन्न महामंडळ व्हीसीएमएसकडून खरेदी करीत आहे. तसेच एसएफसी स्वतंत्रपणे शेतकरी महामंडळामार्फत केंद्र शासनाच्या संरक्षित साठ्याची तूर खरेदी करीत आहे. केंद्र शासनाने तूर खरेदी करिता 90 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला असून राज्यात तुरीची खरेदी 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तुरीचे चांगले उत्पादन झाले आहे. आता खरेदी केलेल्या तुरीसाठी आवश्‍यक बारदाना, साठवणुकीसाठी असणारी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था यांची गोदामे प्राधान्याने तूर साठवणुकीसाठी भाड्याने घ्यावीत, विशेष बाब म्हणून खासगी गोदामे ही भाड्याने घेण्याचे निर्देश वखार महामंडळास सहकार, पणन विभागातर्फे देण्यात आले आहेत. तूर खरेदी केंद्रे ही 15 मार्चपर्यंतच सुरू राहणार असल्याने येथे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुरीची विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: 9 million purchase tur