

Dramatic Chase in Chhatrapati Sambhajinagar Ends with Safe Rescue of Minor Girl
sakal
छत्रपती संभाजीनगर : शहागंज भाजीमंडई परिसरात बुधवारी (ता. २२) रात्री एकाने ९ वर्षांच्या चिमुरडीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, रिक्षा नाल्यात फसल्याने आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलीची सुखरूप सुटका झाली. संशयित रिक्षाचालक रिक्षा घटनास्थळीच सोडून पसार झाला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.