esakal | १८ कॅम्पमध्ये ९३३ नागरिकांची सोय
sakal

बोलून बातमी शोधा

camp citizen.jpg

जिल्ह्यात वेगवेगळ्या उद्देशाने आलेले नागरिक अडकले. यात कामानिमित्त आलेल्या मजूरांचाही समावेश आहे. अशा ९३३ नागरिकांना प्रशासनाने १८ कॅंम्पमध्ये निवासी व्यवस्थेत ठेवले आहे. यात १११ नागरिक बाहेर जिल्ह्यातील तर ८२२ नागरिक बाहेर राज्यातील आहेत.

१८ कॅम्पमध्ये ९३३ नागरिकांची सोय

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील ८२२ तसेच इतर जिल्ह्यातील १११ नागरिकांना १८ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणासह निवासाची व्यवस्था प्रशासनाकडून योग्य रित्या होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

९३३ नागरिकांची सोय 
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासन तसेच प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर काम केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आहे, त्याच ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या साठी शासनाने प्रारंभी २१ दिवसाचा तर यानंतर १९ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या उद्देशाने आलेले नागरिक अडकले. यात कामानिमित्त आलेल्या मजूरांचाही समावेश आहे. अशा ९३३ नागरिकांना प्रशासनाने १८ कॅंम्पमध्ये निवासी व्यवस्थेत ठेवले आहे. यात १११ नागरिक बाहेर जिल्ह्यातील तर ८२२ नागरिक बाहेर राज्यातील आहेत. या सर्वांच्या जेवणासह राहण्याची उत्तम सोय प्रशासनाने केली आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. संबधीत नागरिकांची कोणतीही तक्रार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा....भाजीपाला, फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

१८ कॅम्पमध्ये असलेले नागरिक
मुखेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग कॅम्प, सावरमाळ - ९१, एकलारा कॅम्प मुखेड- तीन, रुद्राणी कॅन्स्ट्रशन कॅम्प मुखेड - ३२, लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड - ३८, शिवाजी मंगल कार्यालय किनवट - ३८, बरडशेवाळा कॅम्प हदगाव १८३, हळदा (ता. कंधार) कॅम्प - ७१, कलथीया कॅम्प गऊळ - १०३, कलथिया कॅम्प उस्माननगर - १०३, शारदा कन्स्टक्शन रुइ - ५८, जिल्हा परिषद शाळा पोखरभोसी - २७, श्रीकृष्ण मंगल कार्यालय तरोडा - ४५, शासकीय आश्रमशाळा गोंकुदा किनवट - ३४, कलथिया कॅम्प फुलवळ - १२, आयटीआय देगलूर - २९, तामसा - २०, केदारगुडा - १३, शारदा कॅन्स्टक्शन कॅम्प, मुखेड - ११.

हेही वाचलेच पाहिजे.... शुल्लक कारणावरुन तूर केली जाते परत

गुटखा विक्री बाबत दोघांविरुद्ध गुन्हा
गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणारे कंधार भवानीनगर येथील राहुल बन्सीलाल व्यास व कंधार छोटी गल्ली येथील शेख मतीन शेख नजीर या दोघांनी मोटार सायकल (क्र. एमएच २६ बिएम. ६८३०) वरुन कंधार तालुक्यातील कुरळा येथे प्रतिबंधीत अन्न पदार्थ अकरा हजार ८८० रुपयांचा साठ्याची विक्रीसाठी वाहतूक करत होते. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिबंधीत अन्न पदार्थ बाळगल्यास कारवाइ 
ही कार्यवाही सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणुक, वाहतुक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरट्या पद्धतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाहीस समोर जावे लागेल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.    
 

loading image