Latur News : लातूरध्ये हजाराची लाच घेताना पोलिसाला पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
police
policesakal

लातूर : तक्रारदाराच्या विरुद्ध दाखल झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यात अटक न करणे व भविष्यात तपासात सहकार्य करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकाला बुधवारी (ता. तीन) ताब्यात घेण्‍यात आले. ही कारवाई येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या विरोधात भांडणाचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला अटक न करता सोडून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला आणि दाखल गुन्ह्यात भविष्यात मदत करण्यासाठी या पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक युवराज बालाजी जाधव (वय ३२, रा. श्रीनगर, मूळ रा. हनुमंतवाडी हाडोळी, ता. निलंगा) याने एक हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून मंगळवारी (ता. दोन) तक्रार दिली होती.

त्यानंतर या विभागाच्या पथकाने मंगळवारी व बुधवारी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी येथील दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिस चौकीत तक्रारदाराने पोलिस नाईक युवराज जाधव याची भेट घेतली.

लाचेची रक्कम एक हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना युवराज याला पथकाने पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक पंडित रेजितवाड, पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर, भास्कर पुल्ली आदींनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com