आधार बालकाश्रमाला राज्यातील पहिला ‘आयएसओ’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

औरंगाबाद - महाराष्ट्र शासानाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने फुलंब्री येथील आधार बालकाश्रमाने राज्यातील पहिले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र पटकाविले आहे. 

औरंगाबाद - महाराष्ट्र शासानाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने फुलंब्री येथील आधार बालकाश्रमाने राज्यातील पहिले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र पटकाविले आहे. 

वर्ष २००९-१० मध्ये महिला आणि बालकल्याण विभागाने या बाकलाश्रमाला परवानगी दिली. दर्जेदार सोयी आणि सुविधा बालकांना पुरविणाऱ्या जय श्रीराम महिला शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था संचालित आधार बालकाश्रमाने आयएसओ ९००१ः२०१५ प्रमाणपत्र पटकाविले. हे प्रमाणपत्र मिळविणारे ते पहिले बालकाश्रम ठरले आहे. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विभागाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या खडतर अटींवर बालकाश्रम खरे उतरले आहे. या प्रमाणपत्रासाठीच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी बालकाश्रमच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले होते.

विद्यार्थ्यांचे संरक्षण, गुणवत्ता, स्वच्छता, भोजन, आरोग्य आदी विषयांवर ही पाहणी आधारित असते. त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा संगीता भाऊसाहेब ताठे, जिजाबाई कापडे, अश्‍विनी घुगे, वैशाली कापडे, रूपाली ताठे-ढाकणे यांचे सर्वत्र अभिनंदन होते आहे. दरम्यान, आयएसओ मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने भाऊसाहेब ताठे यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार केला. या वेळी आमदार अतुल सावे, नारायण कुचे, डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे आदींची उपस्थिती होती.

Web Title: aadhar blakashram first iso