maha eseva kendra
sakal
चाकूर - राज्य शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा देणारे आपले सरकार पोर्टल मागील तीन दिवसांपासून बंद असल्याने जिल्ह्यातील नागरिक, विशेषतः विद्यार्थी व पालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप सेवा सुरळीत झालेली नाही, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अर्ज दाखल करण्याची ३० एप्रील शेवटची तारीख असून कागदपत्रा अभावी विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येत नसल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.