esakal | पाण्यात उभे राहून घोषणा देत, धनगर आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात अर्ध जलसमाधी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Ardh Jalsamadhi Andolan In Chopali For Dhangar Reservation

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जय मल्हार सेनेच्या वतीने राज्यभर अर्ध जलसमाधी आंदोलनाची हाक दिली होती.

पाण्यात उभे राहून घोषणा देत, धनगर आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात अर्ध जलसमाधी आंदोलन

sakal_logo
By
रविंद्र भताने

चापोली (जि.लातूर) : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जय मल्हार सेनेच्या वतीने राज्यभर अर्ध जलसमाधी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला चापोली (ता.चाकूर) येथील समाज बांधवांनी प्रतिसाद देत गुरुवारी (ता.२२) आमराईतील बंधाऱ्यात अर्धवट पाण्यात उभे राहून घोषणा देत अर्ध जलसमाधी आंदोलन केले.

रोजगार हमी योजना मंत्री भुमरे यांच्या निवासस्थानापासून धनगर आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन सुरू


धनगर समाजाला अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करावे. यासाठी धनगर समाजबांधव आक्रमक झाले आहेत. यासाठी जय मल्हार सनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे यांनी राज्यभर अर्ध जलसमाधी आंदोलनाची घोषणा दिली होती. त्यामुळे चापोलीसह उमरगा, धनगरवाडी, अजनासोंडा व येनगेवाडी येथील धनगर समाज बांधव येथील आमराईतील बंधाऱ्यावर वाहत्या पाण्यात उतरून गुरुवारी अर्ध जलसमाधी आंदोलन केले.

यावेळी ‘आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जय मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश शेवाळे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष गडदे, युवा तालुकाप्रमुख नारायण काचे, खंडेराव शेवाळे, बालाजी कोरे, दीपक शेवाळे, दत्ता हक्के, गोविंद शेवाळे, राम शेवाळे, विजय कोरे  यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर