प्रतिपंढरपुरात वैष्णवांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

वाळूज - प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त रविवारी रात्रीपासूनच वैष्णवांचा मेळा भरण्यास सुरवात झाली. विठुनामाच्या गजरात रात्री १२ वाजता दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. पूजेनंतर सामूहिक महाआरती होऊन रात्री १ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त सोमवारी दुपारी ४ वाजता माऊली दिंडीची नगरप्रदर्शना, सायंकाळी पाच ते सात या वेळेत हरिपाठ, रात्री आठ ते दहा महंत राजेश्वर गिरी महाराज, श्रीक्षेत्र चिंचडगाव यांचे कीर्तन, रात्री दहा ते पहाटेपर्यंत हरिजागर आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी सकाळी बबनराव पेरे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपूर येथे दर्शनासाठी मराठवाड्यासह जिल्ह्यातून भाविक वारकरी दिंड्यासह लाखोंच्या संख्येने येतात.

समाधानकारक पाऊस असल्याने यावर्षी भाविकांची संख्या वाढणार आहे. रविवारी दुपारपर्यंत अडीचशे दिंड्यांची नोंद झाली होती. ती सोमवारी वाढणार आहे.

ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था
मंदिर समिती, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनातर्फे यात्रेची तयारी झाली असून, विविध सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने भाविकांसाठी चहा, फराळ व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Web Title: aashadhi ekadashi vittal rukmini pratipandharpur