मंत्री लोणीकरांना काळे झेंडे दाखवून "भारिप' कार्यकर्त्यांकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

आष्टी - भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा ताफा अडवत आज (ता. 9) घोषणाबाजी केली; तसेच काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. मध्य प्रदेश येथील महू या गावी भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात बोलत असताना तेथील भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी हल्ला करीत ऍड. आंबेडकर यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ आष्टी बस स्थानक परिसरात भारिपच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांचा ताफा अडवून घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. या वेळी तेथे भाजपचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Web Title: aashti marathwada news black flag to babanrao lonikar