मुलास रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी वडीलांकडे सुपुर्द
मुलास रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी वडीलांकडे सुपुर्द

रागाच्या भरात पळालेला अभिजीत पालकांच्या स्वाधीन 

पूर्णा (जि.परभणी) : रागाच्या भरात घरातून पलायन करून मुंबईला पळून जाणाऱ्या नांदेड येथील अभिजीतला रेल्वेतील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुन्हा घरी जाता आले. त्याला प्रवाशांनी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यास त्याच्या वडीलांना सुपुर्द करण्यात आले आहे.

नांदेड येथील चौफाळा परिसरातील सातवीत शिकणारा अभिजीत गोविंद सुर्यवंशी (वय १३) यास तो शाळेत नियमित जात नाही म्हणून  पालक रागावले त्यांच्या रागवण्यामुळे दुखावल्या गेलेल्या अभिजीतने  सोमवारी (ता.दोन) सकाळी राग मनात धरून घरातून निघून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला व त्याने नांदेड रेल्वे स्टेशन गाठले. नांदेड रेल्वेस्थानकावर तपोवन एक्सप्रेस उभी होती. तो नांदेड रेल्वे स्थानकावरून नांदेड ते मुंबई (तपोवन एक्स्प्रेस) मध्ये बसला. 


दरम्यान, रेल्वेत बसला तर खरे पण त्याची चुळबुळ व अस्वस्थता रेल्वेतील  प्रवाशांच्या लक्षात आली. काही प्रवाशांनी त्याच्याशी हळूवार संवाद साधला त्याला धीर देत हिम्मत दिली. या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बल व पूर्णा पोलिसांना दिली. पूर्णा रेल्वे स्थानकावर रेल्वे येताच त्याला प्रवाशांनी पूर्णा रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक संजय बोरोकर, गौतम दवणे, स्थानिक पोलिस गिरीश चन्नावार, मनोज नळगीरकर यांच्या ताब्यात दिले. त्यास ताब्यात घेऊन सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणण्यात आले. अभिजीतच्या वडीलांशी संपर्क साधून त्यास त्यांच्या ताब्यात दिले. याबद्दल पूर्णा पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांचे प्रवासी व नागरिकांनी कौतुक केले.

डोळे पाणावले....
बाप व लेकरांची पुन्हा भेट घडवून आणणाऱ्या तपोवन एक्सप्रेस मधील जागृत पण अनामिक प्रवाशांचे गोविंद शेषेराव सूर्यवंशी यांनी ऋण व्यक्त केले. तात्काळ संपर्क रुसून गेलेला मुलगा संपर्क साधून ताब्यात दिल्याबद्दल त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी रेल्वे सुरक्षा बल व पूर्णा पोलिसांचे आभार मानले.



हे ही वाचा... 

वाहकाची  तिकीट मशीन लांबवली

गंगाखेड : येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बस थांबली असताना बसमधील प्रवाशी उतरताना खिडकीतून वाहक प्रवाशांचे सुटे पैशे देताना त्यांच्या जागेवर ठेवलेली बस तिकिट मशिन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.दोन) दुपारी दीड वाजता घडली. वाहकाने तक्रार दिल्यावरून गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील मशिन २५ हजार रूपयांची असल्याचे तक्रारीत नमुद केले.

बुलढाणा येथून अहमदपूरकडे जाणाऱ्या बस क्रमांक (एम. एच. २० डी. एल. ३०९१) ही बस सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील डॉ. आंबेडकर चौक परिसरात आल्यानंतर येथे प्रवासी उतरत असताना चोरट्याने वाहकाजवळ असलेली प्रवाशी टिकीट मशीन चोरून नेल्याची घटना घडली. बस गंगाखेड स्थानकात पोहोचल्यानंतर वाहकाच्या ही बाब लक्षात आल्याने वाहक व चालकाने टिकीट मशीनचा शोध घेतला. मात्र, मशीन मिळून आली नाही. यावरून वाहक बापू शहाजी नामपल्ले (रा.अहमदपूर आगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com