ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था उघड; अभिजित दिपके यांचा सरकारवर शिक्षण सुविधांबाबत थेट निशाणा
CJP founder Abhijit Dipke interacting with villagers during his inspection of a Zilla Parishad school in Ausa taluka, Latur district.

CJP founder Abhijit Dipke interacting with villagers during his inspection of a Zilla Parishad school in Ausa taluka, Latur district.

Sakal

Updated on

औसा : आमदार, खासदार, मंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळांमध्ये अद्ययावत शैक्षणिक सुविधा घेत असताना गोरगरीबांची मुले मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. शाळेत पिण्याचे पाणी नाही, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, छत गळके, खिडक्या तुटलेल्या, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबतही तक्रारी आहेत. त्यामुळे ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या; मग गोरगरिबांच्या मुलांची परिस्थिती कळेल,’ असा घणाघात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com