परस्पर गर्भपात करून विवाहितेचा छळ

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद : महिलेचा परस्पर गर्भपात करून तिचा छळ केल्या प्रकरणी शनिवारी (ता. 18) जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

औरंगाबाद : महिलेचा परस्पर गर्भपात करून तिचा छळ केल्या प्रकरणी शनिवारी (ता. 18) जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

ममता ऊर्फ अनिषा मिलिंद बाविस्कर (रा. शिरफाटा, खोपोल जि. रायगड, ह. मु. वैशालीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, पती मिलिंद देवराम बाविस्कर यांना शिक्षकाची नोकरी लागावी, यासाठी माहेराहून आठ लाख रुपये आणावेत, अशी मागणी सासरच्या मंडळींनी केली. त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून परस्पर गर्भपात केला. शिवाय गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

त्यानुसार पोलिसांनी पती मिलिंद बाविस्कर, सासरा देवराम बाविस्कर, राजेश बाविस्कर यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न व छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली.

Web Title: abortion and woman tortured