"समाजकल्याण'च्या विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन 

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद-  स्वच्छतागृहाची दुर्दशा, गळक्‍या खोल्या, अस्वच्छ परिसरामुळे भटकी कुत्री, जनावरांची दहशत तसेच सायकल, दुचाकी चोरीच्या घटना तसेच जेवणात कच्च्या जळालेल्या पोळ्या, नासकी फळे-भाज्या असलेले निकृष्ट दर्जाचे जेवण याबाबत तक्रार केल्यावर वसतिगृहात काढून टाकण्याची धमकी देत "आम्ही मुख्यमंत्र्यांशेजारी बसतो, आमचे कोण काय बिघाडणार?' अशी भाषा वापरी जात असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.16) सकाळीच वसतिगृहासमोर आंदोलन सुरू केले. 

वसतिगृहाच्या आवारात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त एस. एम. शेळके यांना धारेवर धरले. त्यांच्यापुढे विद्यार्थ्यांना सामना करावा लागणाऱ्या अडचणींची जंत्रीच सादर केली. एकूण 22 मागण्या वाचून दाखवण्यात आल्या. त्यामध्ये जेवणाच्या, स्वच्छतेसंदर्भातील सीसीटीव्ही नसल्यामुळे सायकल, दुुचाकींची चोरी करणाऱ्यांचे फावते. सडलेले फळे, जळालेल्या पोळ्या विद्यार्थ्यांना आणि चांगल्या पोळ्या कर्मचाऱ्यांना असा दुजाभाव. निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रार केली तर, "लायकी पाहून वागा', मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची पोहच असल्याचे विद्यार्थ्यांना सुनावले जाते. 


प्रवेश प्रक्रियेतही सावळागोंधळ असून विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असल्याचा समज करून त्यांना इतरांची गुणवत्ता डावलून प्रवेश दिला जात असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांनी केला. या वसतिगृहात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह विदर्भ, चंद्रपूर, सातारा, सांगली आदी विविध भागातील विद्यार्थी राहात असल्याचे या वेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. 

समाजकल्याण विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत भेटीसाठी आलेले सहायक आयुक्त एस. एस. शेळके यांना घेराव घालत 22 मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर सहायक आयुक्त शेळके यांनी ज्या मागण्या विभागाच्या अखत्यारीत येतात, त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही केली जाईल. खोल्यांना गळती लागण्यासारख्या अडचणी सोडवण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन विद्यार्थ्यांना दिले. या वेळी वसतिगृह अधीक्षक श्री. जाधव यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com