esakal | परळी तालुक्यात पोलिसांच्या १९१ जागा रिक्त, अतिरिक्त ताण वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगानाही आता पोलिस विभागात जाता येणार

परळी तालुक्यात पोलिसांच्या १९१ जागा रिक्त, अतिरिक्त ताण वाढला

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील शहर, संभाजीनगर, ग्रामीण पोलिस ठाण्यास रिक्त जागांचे ग्रहण लागले असून तब्बल १९१ जागा रिक्त आहेत. कोरोना काळामुळे पोलिस प्रशासनावर अतिरिक्त ताण आला आहे. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. याकडे पालकमंत्री धनंजय मुंडे व वरिष्ठ पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहर व तालुक्याची अंदाजे लोकसंख्या साडेतीन लाखाच्या आसपास आहे. या लोकसंख्येसाठी तालुक्यात ४ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. यामध्ये सिरसाळा, शहर, संभाजीनगर, ग्रामीण पोलिस ठाणे आहेत. यातील शहरात संभाजीनगर, शहर व ग्रामीण पोलिस ठाणे कार्यरत आहेत. या पोलिस ठाण्यात तब्बल १९१ जागा रिक्त आहेत. शहराची जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. शहर पोलिस ठाण्यांतर्गत वैद्यनाथ मंदिर, नगरपालिका, पंचायत समिती, तहसील, कृषी विभाग, सिंचन विभाग, न्यायालय, शासकीय विश्रामगृह, पाटबंधारे विभाग येतात. वैद्यनाथ मंदिर बंद असले तरी सुरक्षेसाठी तीन कर्मचारी कार्यरत आहेत. या शहराचा जवळ एक तृतीयांश भाग शहर पोलिस ठाण्यांतर्गत येतो. या पोलिस ठाण्यास १३२ पोलिस कर्मचारी मंजूर असून यातील ४८ कर्मचारी कार्यरत आहेत. तर ८४ पदे रिक्त आहेत.

हेही वाचा: दानवे अन् कराडांची आगळी-वेगळी मैत्री, बैलगाडीतून प्रवास!

या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असून गेल्या दीड वर्षांपासून कोरोना उपाययोजनेचाही अतिरिक्त ताण पोलिस कर्मचाऱ्यांवर आला आहे. तसेच शहराचे मुख्य मार्केट याच पोलिस ठाण्यांतर्गत येते या बाजारपेठेच्या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. बाजारपेठेत एकही पोलिस कर्मचारी हजर नसतो.या कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने शहरात संभाजीनगर वेगळे पोलिस ठाणे तयार करण्यात आले. मात्र यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्याऐवजी शहर पोलिस ठाण्याच्याच कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे करण्यात आल्याने शहर पोलिस ठाण्यास अतिरिक्त ताण आला आहे. संभाजीनगर पोलिस ठाण्यातही ५० टक्के पोलिस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे वेगळे पोलिस ठाणे तयार करून याचा काही उपयोग झाला नाही. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा: परभणीतील रस्ते जलमय, पालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे

ग्रामीण पोलिस ठाण्यातील ४१ पदे रिक्त

तालुक्यातील ८२ गावांच्या रक्षणासाठी ग्रामीण पोलिस ठाणे कार्यरत आहे. या ग्रामीण पोलिस ठाण्यात ६५ पोलिस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र २४ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यातील १० पोलिस कर्मचारी संलग्न आहेत. ४१ पदे रिक्त आहेत. या पोलिस ठाण्यांतर्गत दोन ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा आहेत. त्याठिकाणी काही पोलिस कर्मचारी पाठवावे लागतात तसेच चार पोलिस कर्मचारी कोर्टाच्या कामकाजासाठी तर उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांकडे १२ गावांतील कंटेन्मेंट झोनच्या ड्युट्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात व इतर कामासाठी सध्या ग्रामीण पोलिस ठाण्यास कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तसेच चार अधिकाऱ्यांची फक्त पदे मंजूर आहेत. यात पोलिस निरीक्षक, साहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दोन अशी पदे असून ही पदे कार्यरत आहेत. पण पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कारभार पाहता आणखी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत व इतर प्रमुख रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. बाजारपेठ सुरू असताना कोठेही पोलिस कर्मचारी दिसून येत नाही. यामुळे बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडी व चोरीच्या घटना घडत असतात. यासाठी शहरातील वाहतूक समस्यांचा विचार करता येथे स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करणे आवश्यक आहे.

loading image