esakal | परभणीतील रस्ते जलमय, पालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी : महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मुसळधार पावसाने शहराची तुंबापुरी झाली.

परभणीतील रस्ते जलमय, पालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : मुसळधार पाऊस Rain, ढगफुटीने शहरातील रस्ते जलमय होतात. त्यात अनेक घटक कारणीभूत असले तरी रविवारी (ता.११) झालेल्या पावसाने मात्र महानगरपालिकेच्या Parbhani Municipal Corporation मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेचेच पितळ उघडे पाडले आहे. वास्तविक पाहता ही मोहिम कधी सुरू झाली व कधी गुंडाळली हे कधी समजलेच नाही. महानगरपालिकेची यांत्रिकी विभाग व स्वच्छता विभागाच्या वतीने राबवण्यात येणारी मान्सुनपूर्व मोहिम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असती. या वर्षी सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर एकीकडे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, तर दुसरीकडे कामे सुरू असल्याचे सांगितले जात होते. परंतु बसस्थानकाजवळचा Parbhani एक नाला सोडला तर उर्वरीत भागात केव्हा, कधी व कशी मोहिम राबविण्यात आली ते या दोन्ही विभागालाच माहीत. parbhani municipal corporation ignore cleaness works, so roads flooded

हेही वाचा: Aurangabad Rain Updates : औरंगाबादेत जोरदार पाऊस

वास्तविक पाहता यांत्रिकी विभागाकडे दोन जेसीबीसह अनेक वाहने, साहित्य, सफाई कामगार आहेत. परंतु दरवर्षी लाखो रुपये खर्च करून हे दोन्ही विभाग स्वच्छता मोहिम राबवतात व त्यास प्रशासनासह पदाधिकाऱ्यांची मुक संमती असल्याचे दिसून येते.

नाल्यांवरील अतिक्रमणे कारणीभूत

शहरात ४० ते ५० मोठे नाले व ७०-८० छोटे नाले असल्याचे यांत्रिकी विभागाकडून सांगितले जाते. परंतु या नाल्यांची सद्यःस्थिती काय आहे याची तसदी मात्र हे विभाग घेत नाहीत. अनेक नाले आता अतिक्रमणाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक नाले अरुंद झाले आहेत, तर काही अतिक्रमणांनी गडप झाले आहेत. एक-दोन मोठे नाले वगळता अन्य नाले तर दिसून देखील येत नाहीत.

हेही वाचा: दानवे अन् कराडांची आगळी-वेगळी मैत्री, बैलगाडीतून प्रवास!

थातूरमातूर नाले नालेसफाई कारणीभूत

शहराच्या मध्यवर्ती भागाला अक्षरशः तळ्याचे स्वरुप आले होते. शिवाजी चौक, कच्छीबाजार, गुजरी बाजार, क्रांती चौक, गांधी पार्क यासह अनेक भाग पाण्याखालीच होते. तर वसमत रोडसह अन्य मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम थातूरमातूर झाल्याचेच यातून दिसत आहे.

नरोवा-कुंजरोवा वृत्ती कारणीभूत

महापालिकेच्या या दोन्ही विभागावर कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाही. झालेल्या कामांची पाहणी देखील या विभागाचे उपायुक्त, आयुक्त कधी करीत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे या विभागाच्या मनमानी व कंत्राटदार धार्जिण्या धोरणांचा शहरातील नागरिकांना फटका बसत असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहणार प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांची चौकशीसाठी समिती गठण करुन दोषी आढळल्यास कारवाई प्रस्तावित करणे गरजेचे आहे. परंतु त्यांची नरोवा कुंजरोवा वृत्ती नागरिकांच्या मुळावर येत आहे.

loading image