
चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिदर्शन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४१ जणांनी माघार घेतल्यामुळे २१६ जागेसाठी पाचशे उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत.
चाकुर (जि.लातूर) : चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिदर्शन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४१ जणांनी माघार घेतल्यामुळे २१६ जागेसाठी पाचशे उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत. केंद्रेवाडी व ब्रह्मवाडी या दोन ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून वडवळ नागनाथ येथून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीच्या निवडणुक उतरले आहेत. तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ६५५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छावणी अंती ६४८ अर्ज शिल्लक राहिले होते. सोमवारी (ता.चार) नामनिदर्शन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'
अर्ज दाखल केलेल्या व्यक्तींची मनधरणी करत त्यांचा अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत चालू होते. १४१ जणांनी माघार घेतल्यानंतर २४ ग्रामपंचायतीतील २१६ जागेसाठी पाचशे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नळेगाव या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींच्या १७ जागेसाठी ७० उमेदवार निवडणुक रिंगणात असून येथे चौरंगी लढत होत आहे. वडवळ नागनाथ येथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन कसबे हे निवडणुक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या दोन्ही गावातील निवडणूक चुरशीच्या होणार आहेत. महाळंगी २८, हाडोळी १५, झरी (खु) १८, कडमुळी १३, वडवळ नागनाथ ३८, दापक्याळ १५, जगळपुर १२, शिवणखेड २५, अजनसोंडा २६, शेळगाव २२, राचन्नावाडी २०, टाकळगाव १४, बोरगाव २२, महाळंग्रा २७, नागेशवाडी १८, रोहिणा २६, उजळंब १८, कबनसांगवी १९, बावलगाव १४, नळेगाव ७०, लिंबाळवाडी १४, महाळंग्रावाडी १२ अर्ज शिल्लक राहिले आहेत.
केंद्रेवाडी व ब्रह्मवाडी ग्रामपंचायत बिनविरोध
केंद्रेवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागेसाठी तेवढेच अर्ज दाखल झाले यात सावित्रा दगडू केदार, राम माणिक केंद्रे, शशिकांत माधव केंद्रे, वसुदेव केंद्रे, अज्ञानबाई बाबु केदार, बारकाबाई विठ्ल केदार, निर्मलबाई गुरुनाथ केंद्रे यांचा समावेश आहे.
संपादन - गणेश पिटेकर