लातूर जिल्ह्यात ६० हजार १९ जणांची कोरोना तपासणी, रुग्णसंख्येत होतेय वाढ

हरी तुगावकर
Sunday, 6 September 2020

काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोना संबंधीने अॅंटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार १९ जणांची तपासणी झाली असून, यात नऊ हजार ५४३ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे.

लातूर : काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संबंधीने अॅंटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार १९ जणांची तपासणी झाली असून, यात नऊ हजार ५४३ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. यात ३७ हजार ३१ जणांची अॅंटीजेन टेस्ट तर २२ हजार ९८८ आरटीपीसीआरच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे. रोज अडीचशे ते तीनशे रुग्ण समोर येत आहेत. यात तर गेल्या दोन दिवसांत चारशे पेक्षा जास्तजणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात ६० हजार १९ जणांची तपासणी झाली होती. यात ३७ हजार ३१ जणांच्या अॅंटीजेन टेस्ट करण्यात आल्या. यातून पाच हजार ८७३ जण पॉझिटीव्ह आले. २२ हजार ९८८ जणांच्या आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून, यात तीन हजार ६७० जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची एकूण संख्या नऊ हजार ५४३ आहे.

शेतात काहीच करमना गेलंय, सोयाबीन पण हाती लागणार नाही?

सप्टेंबरही ठरू शकतो धोकादायक
लातूर जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोना बाधित रुग्ण समोर येत आहेत. त्यात आतापर्यंत सर्वाधित ऑगस्ट महिना धोकायदाक ठरला आहे. पाच साडेपाच हजारापेक्षा जास्त रुग्ण एका ऑगस्टमध्येच आले आहेत. आता सप्टेंबर सुरू झाला आहे. यात पाच दिवसांची कोरोना बाधितांची आकडेवारी पाहिली तर ती चिंताजनक आहे. चारशे पेक्षा जास्त रुग्ण रोज येत आहेत. त्यामुळे सप्टेंबरदेखील लातूर जिल्ह्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे लातूरकरांना शासनाने सांगितलेल्या उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

अरे बाप ! एकशे पासष्ट कुटुंबाच्या गावात कोरोनाबाधितांची संख्या एवढी !

आकडे बोलतात
घरात अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या---४७५३७
१४ दिवस कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्ती---३८९८६
सध्या घरात अलगीकरण असलेल्या व्यक्ती--८५५१
संस्थात्मक अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या--१३५९६
१४ दिवस कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्ती--१२४६२
सध्या संस्थात्मक अलगीकरण असलेल्या व्यक्ती--११३४
आरटीपीसीआर तपासणी---२२९८८
आरटीपीसीआरमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्ती--३६७०
अॅन्टीजेन तपासणी---३७०३१
अॅन्टीजेन तपासणीत पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्ती--५८७३

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Above Five Thousand Corona Positive In Antigen Test Latur News