अपघातग्रस्त गायीचे वाचविले प्राण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

औरंगाबाद - रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या एका गायीचे अग्रवाल युवा मंचने प्रथमोपचार करून प्राण वाचवले. शिवाय तिला पुढील उपचारासाठी गुरू गणेशनगर येथील गुरू गणेश गोशाळेकडे रवाना केले.

औरंगाबाद - रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या एका गायीचे अग्रवाल युवा मंचने प्रथमोपचार करून प्राण वाचवले. शिवाय तिला पुढील उपचारासाठी गुरू गणेशनगर येथील गुरू गणेश गोशाळेकडे रवाना केले.

शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ बुधवारी (ता. १८) या गायीला रेल्वेची धडक बसली. जाग्यावरून उठता येत नसल्याने दोन दिवसांपासून ती पावसात जखमी अवस्थेत पडून होती. शिवाजीनगरातील नंदकिशोर अग्रवाल यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी शुक्रवारी (ता. २०) अग्रवाल युवा मंचच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर याची माहिती टाकून मदतीचे आवाहन केले. मंचचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, उपाध्यक्ष शिरीष अग्रवाल, श्री. भक्कड, गोविंद अग्रवाल, गोपाल अग्रवाल हे भर पावसात डॉक्‍टर व काही साथीदारांना घेऊन घटनास्थळी पोचले. गायीवर प्रथमोपचार करून गायीला मोठ्या प्रयत्नाने व्यवस्थित गाडीत चढवून तिला गुरू गणेश गोशाळेकडे रवाना केले.

दोन दिवसांपासून ही गाय या ठिकाणी होती. पायाला जास्त मार असल्यामुळे तिला उठता येत नाही; परंतु आता तिने चारा खाणे सुरू केले आहे. लवकरच ती उठू शकेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 
- दीपक अग्रवाल, अध्यक्ष, अग्रवाल युवा मंच.

Web Title: accident affected cow life saving