ऑटो - ट्रॅक्टर अपघातात दोन ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

नांदेड : ऑटो व ट्रॅक्टरच्या धडकेत दोघेजण ठार झाल्याची घटना किनवटजवळ थारा ते धानोरा रस्त्यावर 17 जूनच्या रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी किनवट ठाण्यात ट्रॅक्टर व ऑटो चालकांवर गुन्हा दाखल करणयात आला आहे. 

किनवट तालुक्यातील काही अंतर्गत गावामध्ये जाण्यासाठी अवैध वाहतुकीचा वापर केल्या जातो. परंतु कधी कधी हा प्रवास जिवावर बेततो. 

असाच प्रकार रविवारी (ता. 17) रात्री आठच्या सुमारास घडला. किनवटमधील बोधडी येथून धानोरा व थारा येथील चांगदेव लक्ष्मण वागतकर (वय 55) आणि साईनाथ सुधाकर मिरासे (वय 17) हे दोघेजण ऑटो क्रमांक एमएच 26- के - 4767 मधून गावाकडे जात होते. यावेळी ऑटो चालक व समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून समोरासमोर धडकविले. यात ऑटोमधील चांगदेव वागतकर आणि साईनाथ मिरासे हे दोघेजण खाली फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या प्रकरणी नामदेव लक्ष्मण वागतकर यांच्या फिर्यादीवरुन किनवट पोलिस ठाण्यात ऑटो व ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे हे करीत आहेत. 

Web Title: accident of auto and tractor 2 dies

टॅग्स