कोरोनाच्या भीतीमुळे पुण्यातून निघालेल्या मायलेकींना काळाने गाठलेच, मृत्यू झाला

निळकंठ कांबळे
शुक्रवार, 20 मार्च 2020

पुणे शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. विषाणूबाधीत रूग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नोकरी व कामानिमित्त पुणे, मुंबईसह इतर शहरांत गेलेले तालुक्यातील नागरिक आपआपल्या गावांकडे परतू लागले आहेत. यापैकीच होते आजचे हे कुटुंब... 

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतिश पवार हे कामानिमित्त पुणे थेथे वास्तव्यास आहेत. पुण्यात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने ते आपल्या कुटुंबांसह एकाच कारमधून पुण्याहून लोहारामार्गे माकणीकडे निघाले होते.

गावापासून अवघ्या तीन ते चार किमीटर अंतरावर असलेल्या खेड पाटीजवळ शुक्रवारी (ता. २०) दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांचा भीषण अपघात झाला. 

माकणीहून येणाऱ्या एका कंटेनरची (एम.एच.१३ आर १२८७) व त्यांच्या कारची (एम.एच. १२ पीएच ६३२६) समोरासमोर धडक झाली. यात चालक नेताजी मनोहर मोरे (वय २८) यांच्यासह मनिषा नारायण साठे (वय ३२), वैष्णवी नारायण साठे (वय १२), वैभवी नारायण साठे (वय आठ सर्व रा. माकणी) हे चौघे जागीच ठार झाले.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

तर नारायण हरीदास साठे (वय ३६) त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे (वय दोन), शीतल सतिश पवार (वय ३०), संस्कृती सतिश पवार (वय सहा), वेदांत सतिश पवार (वय तीन) असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील हरीष साठे, शीतल पवार यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला, तर शीतल पवार (वय ३०), संस्कृती पवार (वय सहा), वेदांत पवार (वय तीन) यांना उस्मानाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याहून दुःखद आणखी काय असू शकते..

अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला, तर कंटेनरचे समोरील चाक निखळून पडले. कार व कंटेनर यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात कारचालकासह चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये आई व दोन मुलींचा समावेश आहे. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. 

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

कोरोना संसर्गजन्य आजाराचे पुण्यात वाढते संक्रमण पाहता यातून आपली सुटका व्हावी, यासाठी गावाकडे निघालेल्या पवार व साठे कुटुंबावर अखेर काळाने झडप घातली. अपघातात मायलेकरांसह चौघांचा मृत्यु झाल्याने माकणी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident In Lohara Osmanabad Coronavirus News