जालना - भोकरदनजवळ अपघातात एकजण गंभीर जखमी

दीपक सोळंके
गुरुवार, 24 मे 2018

भोकरदन (जालना) : भोकरदन-जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव गावाजवळ आयशर व दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता.24) सकाळी सातच्या सुमारास घडली. सागर वाघमारे (रा.सागवण, बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे. 

भोकरदन (जालना) : भोकरदन-जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव गावाजवळ आयशर व दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता.24) सकाळी सातच्या सुमारास घडली. सागर वाघमारे (रा.सागवण, बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे. 

टेंभुर्णी (ता.जाफ्राबाद) येथून कापूस खरेदी करून भोकरदनकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने भोकरदनहुन बुलडाण्याकडे जाणाऱ्या दुचाकीला सामोरून जोराची धडक दिली. या धडकेनंतर आयशर रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातातील जखमीला नागरिकांनी तत्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर मार असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रस्ता रुंदीकरणाची मागणी
दरम्यान या रस्त्यावर गेल्या काही दिवसांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता विदर्भातील बुलडाणा, खामगाव, अकोला, शेगाव, नागपूरसह भोकरदन तालुक्यातील अनेक मोठ्या गावांना जोडला जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, हा रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Web Title: accident near bhokardan 1 injured in jalana