सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर - कारचा भीषण अपघात

भगवंत सुरवसे
Wednesday, 20 January 2021

सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया जवळील पेट्रोल पंपासमोर मोठा अपघात झाला.

नळदुर्ग (उस्मानाबाद): सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया जवळील पेट्रोल पंपासमोर मोठा अपघात झाला. बुधवारी ता.२० रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक करताना झालेल्या आपघातात कार चालक गंभीर जखमी झाला. अपघातावेळी कार तीन वेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्षी पाहणा-यांनी सांगितले.

येथील जवळच असलेल्या महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी ड्रायव्हरला बाहेर काढून नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवले. या मार्गाचे रूंदीकरण झाल्यामुळे वाहने सुसाट धावत असून नेहमी आपघात होत आहेत. यामुळे नागरिकांनी व महामार्ग पोलीसांनी गतीरोधक बसवण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे माञ या आठवड्यातील हा दुसरा आपघात या मार्गावर घडला आहे.

वाळूजमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात, रिक्षाचा चुराडा

सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या जी.जे. १२ ए.डब्लू ००९१ या टँकरला ओव्हरटेक करताना जोरदार धडक लागून टी.एस. १५ ई.व्ही.४५४८ ही कार पलटून कारचालक प्रतिक सोनवणे ( वय ३५ रा. दापोडी, पुणे) हे गंभीर जखमी झाले तर कारचे मोठे नुकसान झाले. महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत कवले, पो.ना. आर.बी.कदम, नितीन सुरवसे, परमेश्वर मुपडे, आल्ताफ गोलंदाज, राहूल वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कार चालकास प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले.

मोबाईलवरुन मिळणार अपघातप्रवण स्थळाची माहिती, पोलिसांनी बनवले ‘सेफ ड्राईव्ह’ अॅप

नळदुर्ग बसस्थानक ते गोलाईपर्यंत ( तुळजापूर फाटा) गतीरोधक बसवण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे. तसेच महामार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रशेखर सुतार यांनी तीन महिन्यापुर्वी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सोलापूर, टोल प्लाझा व्यवस्थापक व महामार्गाचे काम करणाऱ्या कंञाटदार कंपनीस  लेखी निवेदन देऊन गतीरोधक बसवण्याची मागणी केली होती. माञ संबंधितांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या मार्गावर  रूंदीकरण केल्यामुळे वाहने वेगाने जात असल्यामुळे नेहमी आपघात होत आहेत. मागील महिन्यात अणदुर येथील रिक्षाचालक तरूणाचा दुर्दैवी अंत झाला. अपघाताची मालिका सतत सुरू आहे. यामुळे  या मार्गावर  गतीरोधक बसवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident news Tanker car accident on Solapur Hyderabad National Highway