औरंगाबाद - पुणे राष्ट्रीय महामार्गावर नवीन कायगावजवळ अपघातात एकाचा मृत्यू

जमील पठाण
Tuesday, 29 December 2020

या रस्ता अपघातात टोयटा कार मधील चालक एकमेव व्यक्ती गंभीर जखमी झाला असून कारचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे.

कायगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नवीन कायगाव (ता.गंगापूर) येथे मंगळवारी (ता.29) सकाळी पावणे सातच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादने नगर, पुण्याच्या दिशेने जाणारी टोयटा कार एम.एच.14 सी. के. 7042 या वाहन चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन हवेत उफळून बाजूने येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम. एच. 46 ए. एफ. 8385 वर जाऊन जोराने आदळले.

गॅस दरवाढीविरुध्द अनोखं आंदोलन; नववधूच्या हातच्या भाकरी पंतप्रधान मोदींना पार्सल

या रस्ता अपघातात टोयटा कार मधील चालक एकमेव व्यक्ती गंभीर जखमी झाला असून कारचा तर अक्षरशः चुराडा झाला होता. जखमींस नागरिकांनी व पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. जखमी व्यक्तीचे नाव आणि गाव अजून समजले नाही.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident on pune aurangabad highway nagar