अंबड-जालना महामार्गावर दोन ट्रकची धडक

truck
truck

अंबड (जालना) : अंबड जालना महामार्गावरील लालवाडी फाट्याजवळ दोन ट्रकचा शुक्रवारी (ता. 31) सकाळी साडेसहा वाजता अपघात झाला. अंबड शहराकडून जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.18 ए.ए.1236 चा जालना येथील चालक सय्यद रऊफ सय्यद असमोद्दीन याच्या दोन्ही पायाला दुखापत झाली अाहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड जालना महामार्गावरील पडलेले मोठमोठाले खड्डे व साईड पंख्याची साफसफाईची कामे सुरु आहेत. अरूंद रस्ता यामुळे दिवस रात्र अपघात सुरुच आहेत. या घटनेची माहिती मिळताच लालवाडी, पारनेर पेट्रोलपंप, लालवाडीतांडा येथील नागरीकांनी धाव घेतली. मदतकार्य केले.

महामार्गावर वाहतुकीची एक ते दिड तास कोंडी झाली होती. यामुळे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व नोकर वर्गाची धांदल उडाली. शेवटी क्रेन आणून दोन्ही ट्रक बाजुला केले. नंतर अंबडचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com