कन्हेरगाव-हिंगोली रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कन्हेरगाव (हिंगोली) : फाळेगाव पाटी जवळील श्रीकृष्ण मंदिरासमोर दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हिंगोली येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मृत व्यक्ती राजस्थानची रहिवासी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजले नाही. मात्र, दोन्ही दुचाकींच्या समोरच्या टायरच्या रिंग तुटल्याने अज्ञात वाहनाने या वाहनांना मागून धडक दिली. तसेच समोरून येणाऱ्या वाहनाने उडवले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातात एका व्यक्तीच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

Web Title: Accidents on Kanhergaon Hingoli road One dead

टॅग्स