पानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
रेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सोसायटीत प्रचंड घोटाळा व संस्थेचा अनागोंदी कारभार केला असल्याचा आरोप अॅड. मंचक डोणे यांनी पानगाव येथे युवा संघर्ष आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तर अॅड. डोणे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सोसायटीचे चेअरमन रामचंद्र भंडारे यांनी सांगितले.
रेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सोसायटीत प्रचंड घोटाळा व संस्थेचा अनागोंदी कारभार केला असल्याचा आरोप अॅड. मंचक डोणे यांनी पानगाव येथे युवा संघर्ष आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तर अॅड. डोणे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सोसायटीचे चेअरमन रामचंद्र भंडारे यांनी सांगितले.
पानगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक चालु असुन युवा संघर्ष आघाडी व शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनल मध्ये निवडणुक होत असुन रविवारी (ता.२१) मतदान होणार आहे. युवा संघर्ष आघाडीच्या वतीने पत्रकार परीषद घेण्यात आली यामध्ये अॅड. मंचक डोणे यांनी युवा संघर्ष आघाडी या पॅनलची भुमीका मांडताना म्हणाले कि, ''गेल्या १७ वर्षा पासुन विधमान चेअरमन यांनी संस्थेचा कारभार आपल्या खाजगी मालमत्ते प्रमाणे केला असुन २००२ ते २०१८ पर्यंत नियमीतपणे सर्वसाधारण सभा किंवा संचालकांची बैठक घेतल्या नाहीत.''
''सहकारी संस्थेची मालकीचे असलेले तीन गोदाम व एक टॅक्टर हे आजतागायत भाड्याने दिलेले नसल्याने या पासुन एकही रूपयाचे उत्पन्न झाले नाही. तसेच नाहारकत प्रमाणपत्र पासुनही ऊत्पन्न झाले नाहीत. संस्थेकडे रासायनीक खताचे दुकानही नाही किंवा तसा व्यवसायही करत नाही त्यामुळे या पासुनही ऊत्पन्न नाही '' ,असे सचिवाचे लेखी म्हणने आहे. त्यावर अॅड. डोणे यांनी संस्थेच्या मालकीचे गोदाम भाड्याने दिले नाहीत तर आत असलेला खत कोणाचा ? असा प्रश्न उपस्थित करुन बेबाकी प्रमाणपत्रासाठी २०० ते ३०० रूपये घेतले असे शेतकऱ्यांचे पुराव्या निशी म्हणने आहे मग हे लाखो रूपये गेले कुठं ? असा प्रश्न ऊपस्थित करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषन झाले आहे.
खरोळा येथील सेवा सहकारी सोसायटी शेतकऱ्यांना लाभांश देते तर पानगावची सोसायटी का देवु शकत नाही. असा ऊलट सवाल करून या प्रकरणात प्रचंड घोटाळा असुन याबाबीवर तज्ञांचा सल्ला घेवुन कायदेशीर कारवाई करणार आहोत असे अॅड. डोणे यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले. यावेळी सिध्दलींगअप्पा हालकुडे, दत्तात्रय डोणे , दिलीप शेंडगे, दत्ता कस्तुरे, शिवाजी शेंडगे, मुरलीधर डोणे, वास्कोद्दीन सिद्दीकी, महादु वांगे, मुन्ना गुर्ले,सुनील भंडारे,गणेश वांगे,सुधाकर फुले मारोती गालफाडे यांच्यासह युवा संघर्ष आघाडीचे उमेदवार ऊपस्थित होते.
आरोप बिनबुडाचे : भंडारे
याबाबत सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन रामचंद्र भंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अॅड. डोणे यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून पानगाव सेवा सहकारी सोसायटीत एक रुपयाचाही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगून मी सोसायटी चांगली चालवली म्हणूनच गत १५ वर्षापासून सभासदानी व संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास दाखवत चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली.