'या’ प्रकरणातील विसावा आरोपी अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

या प्रकरणात असलेला तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वणीकर हा अद्याप सीआयडीच्या हाती लागला नाही. 

नांदेड : राज्यभर गाजलेल्या धान्य घोटाळ्यातील फरार असलेला विसावा आरोपी गुन्हे अन्वेशन विभागाने (सीआयडी) शुक्रवारी (ता. तिन) रोजी अटक केला. त्याला शनिवारी (ता. चार) नायगाव न्यायालयासमोर हजर केले असा न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात असलेला तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वणीकर हा अद्याप सीआयडीच्या हाती लागला नाही. 

कृष्णूर (ता. नायगाव) येथील एमआयडीसीमध्ये इंडिया मेगा फुड नावाची कंपनी आहे. या कंपनीत  जिल्हा पुरवठा विभाग व धान्य वितरण करणारी यंत्रणा हाताशी धरुन शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे ते थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत. तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी  आपल्या विशेष पथकांमार्फत या कंपनीवर ता. १८ जूलै २०१८ रोजी छापा टाकला. 

हेही वाचा ---नांदेड शहरावर धुक्क्याची चादर

आरोपींची संख्या वाढत आहे
कंपनीतून दहा ट्रक शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ जप्त केले होते. जवळपास एक कोटी ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. कुंटूर पोलिस ठाण्यात ११ ट्रक चालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडीया, वाहतुक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खूराणा यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला. तपासात पुन्हा काही आरोपी करण्यात आले. 
 
अटक आठपैकी मुख्य आरोपीचा जामीन
सीआयडीच्या पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकांनी ता. १० मे २०१९ रोजी मुख्य आरोपी अजय बाहेती, ललित खूराणा, राजू पारसेवार आणि ओमप्रकाश तापडीया यांना अटक केली होती. तेंव्हापासून त्यातील अजय बाहेती वगळता सर्वजन हर्सुल कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. त्यानंतर याच प्रकरणात एक जून २०१९ रोजी पुरवठा विभागाचे रमेश भोसले, रत्नाकर ठाकूर, गोडाऊनकिपर श्री. विप्तल आणि श्री. शिंदे यांना अटक केली. ता. सहा जून २०१९ रोजी या गुह्याचे पहिले दोषारोपपत्र (१४५० पान) ८० साक्षिदारांसह नायगाव न्यायालयात दाखल केले.

हे उघडून तर पहा ----सायबर सुरक्षेसाठी ‘महिलांनी’ जागरुक रहावे

अटक केलेला वजनदार राजकिय नेत्याचा नातेवाईक
या प्रकरणातील फरार असलेला कपील बजरंग गुप्ता रा. कौठा याला अटक करण्यात आला आहे. त्याला राजकिय वरदहस्त असल्याने तो इतके दिवस सीआयडीला गुंगारा देत होता. मात्र त्याच्यावर लक्ष ठेवून असलेल्या सीआयडीने अखेर त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस उपाधिक्षक व्ही. एस. साळुंखे, आर. एम. स्वामी आणि अन्नपूर्णा मस्के हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused arrested in 'this' case