नांदेड शहरावर धुक्क्याची चादर

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 4 जानेवारी 2020

धुक्याचा फटका दुधविक्रेते, वर्तमान विक्रेते, चाकरमाने, अबालवृध्द व मॉर्नींग वॉकवाल्यांसह शाळकरी मुलांना बसला आहे. रेल्वेस्थानक परिसरातही धुके पडल्याने रेल्वेरुळ स्पष्ट दिसत नव्हते.

नांदेड : या आठवड्यात नांदेडकरांना पूर्णवेळ सुर्यदर्शन झाले नाही. शनिवारी (ता. चार) जानेवारी रोजी शहरात धुक्याची चादर पसरली होती. यामुळे दहा फुट अंतरावरील काही दिसत नव्हते. याचा फटका दुधविक्रेते, वर्तमान विक्रेते, चाकरमाने, अबालवृध्द व मॉर्नींग वॉकवाल्यांसह शाळकरी मुलांना बसला आहे. रेल्वेस्थानक परिसरातही धुके पडल्याने रेल्वेरुळ स्पष्ट दिसत नव्हते.
 
नांदेड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सतत वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. अंगातील स्वेटर व कानाची टोपी काढणे दुरापास्त झाले. तर या आठवड्यात जिल्ह्यात व शहरात तुरळक ते जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात तर गारपिट झाल्यामुळे वातावरणातील थंडावा वाढतच गेला आहे. एकंदरीत या वातावरणामुळे गरम कपडे विक्री दुकानावर गर्दी होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील लोहा तालुक्यात कलंबर येथे विज कोसळून बैलाचा मृत्यू झाला असून रब्बी हंगाम पुन्हा अडचणीत सापडला आहे. तुर, कापूस आणि बागायती पिकांना चांगलाच या वातावरणाचा फटका बसत आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हळदीवर करपा नावाचा रोग पडल्याने हवालदील शेतकरी अडचणीच्या विळख्यात अडकला आहे.

हेही वाचा ---सायबर सुरक्षेसाठी ‘महिलांनी’ जागरुक रहावे
 

शहर व जिल्ह्यात धुक्याची चादर 
तिन दिवसापासून सतत शहर व जिल्ह्यात धुक्याची चादर पडत आहे. पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत हे धुक्के पडत असल्याने सकाळी आपल्या दैनंदिनीसाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना चांगलाच फटका बसत आहे. पहाटे तिन वाजल्यापासून वर्तमानपत्र विक्री करण्यासाठी वर्तमानपत्रांच्या टॅक्सीचालकांना, वर्तमानपत्र घरोघरी पोचविणाऱ्यांना, दुध विक्री, तसेच रेल्वे, बस प्रवाशांना या धुक्याचा सामना करावा लागत आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. शाळकरी विद्यार्थीही या धुक्यात शाळेत जाणे पसंद करीत आहे.

येथे क्लीक करा--- Video - स्त्रीशक्तीचा असाही जयजयकार : कसा तो पहा

हजूर साहेब रेल्वे स्थानकावरील दृष्य 
येथील नेहमी गजबजलेले हजूर साहेब रेल्वे स्थानकावर धुक्याची दाट चादर पसरल्याने रेल्वे रुळावर येणाऱ्या पहाटेच्या रेल्वे अत्यंत संथगतीने स्थानकात प्रवेश करीत होत्या. तिन ते चार किलमोमीटर अंतरावरून शिटी देत रेल्वे स्थानकात प्रवेश करीत होत्या. मात्र याचा रेल्वेसेवेवर काहीच परिणाम झाला नाही. शहरात मागील तिन दिवसांपासून जागोजागी शेकोटी पेटविलेल्या दिसून येत आहे. तिन दिवस असेच वातावरण राहील असा अंदाच हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fog sheet on the city of Nanded