'ऑनर किलिंग'प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा

Court
Court

भोकर (जि. नांदेड) - परजातीय प्रियकरासोबत विवाहिता पळून गेल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने चुलत भावाच्या मदतीने दोघांचीही गळा कापून निर्घृण हत्या केल्याची घटना थेरबन (ता. भोकर) येथे दोन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी गुरुवारी मुलीच्या भावाला फाशी, तर त्याच्या चुलत भावास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

भोकरपासून तीन किलोमीटरील थेरबन येथील वेगवेगळ्या जातीतील पूजा दासरे (वय 22) व गोविंद कराळे (वय 25) यांचे प्रेम जुळले. समाजात बदनामी होईल म्हणून घरच्यांनी पूजाचा विवाह भोकर येथील जेठीबा वर्षेवार याच्याबरोबर 2017 मध्ये केला. मात्र पूजा संसार सोडून गोविंदसोबत गेली. याचा राग, अपमान सहन न झाल्याने पूजाचा भाऊ दिगंबर दासरे याने त्याचा चुलत भाऊ मोहन दासरे याच्या मदतीने बहीण व तिचा प्रियकराचा गळा चिरून हत्या केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com