लुटीच्या गुन्ह्यातील आरोपीस सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड केला. प्रकाश ऊर्फ पिंटू भगवान कांबळे (रा. केळवाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. 
 

नगर: रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड केला. प्रकाश ऊर्फ पिंटू भगवान कांबळे (रा. केळवाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. 

दौंड-नांदेड पॅसेंजर रेल्वेतील दोन प्रवाशांच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून कांबळे याने 13 जुलै 2014 रोजी लुटले होते. याबाबत नगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी आरोपीला दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड केला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. विष्णुदास भोर्डे यांनी काम पाहिले.

Web Title: The accused in the robbery case