अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेचा मनःशांतीशी संबंध 

औरंगाबाद ः एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात मॅसिकॉन परिषदेच्या उद्‌घाटनाला उपस्थित डॉ. अरविंद कुमार, अंकुशराव कदम, डॉ. पी. एम. जाधव, डॉ. शशांक दळवी, डॉ. दिलीप गोडे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. रॉय पाटणकर, डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. भास्कर मुसांडे, डॉ. पुरुषोत्तम
औरंगाबाद ः एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात मॅसिकॉन परिषदेच्या उद्‌घाटनाला उपस्थित डॉ. अरविंद कुमार, अंकुशराव कदम, डॉ. पी. एम. जाधव, डॉ. शशांक दळवी, डॉ. दिलीप गोडे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. रॉय पाटणकर, डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. भास्कर मुसांडे, डॉ. पुरुषोत्तम

औरंगाबाद - बदलत्या जीवनशैलीत नव्वद टक्के लोक अॅसिडिटीने त्रासलेले आहेत. चाळिशीनंतर बद्धकोष्ठताग्रस्त होतात. दोन्ही व्याधींचा मनःशांतीशी संबंध आहे. जाहिरातीच्या युगात विविध उपचार सांगितले जातात; मात्र खरा उपाय संतुलित नैसर्गिक आहार, योग्य व्यायाम आणि ध्यानधारणेतच आहे, असा सल्ला डॉक्‍टरांनी एमजीएमच्या द्योतन सभागृहात शुक्रवारी (ता. एक) आयोजित तज्ज्ञांशी संवाद या सत्रात दिला. 

मॅसिकॉन परिषदेत सर्वसामान्य नागरिक व रुग्णांसाठी आयोजित अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यावर तज्ज्ञांशी भेटा चर्चासत्रात डॉ. राजेश सैनानी, डॉ. प्रवीण सूर्यवंशी आणि आहारतज्ज्ञ डॉ. रेणुका राजे यांचा सहभाग होता. 'अॅसिडिटी का होते' यावर मान्यवरांनी मते मांडली. अनियमित जेवण, अतिप्रक्रियेचे अन्न, शिळे, टिकवून ठेवलेल्या अन्नपदार्थांमुळे ऍसिडिटी होते. वारंवार अॅसिडिटीचा आतड्यांवर परिणाम होतो. यातून बद्धकोष्ठता होते. त्यामुळे कायम आहार, विहार, नियमितता यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. अॅसिडिटी झाल्यावर फ्रीजमधील थंड दूध घेतात. त्यामुळे लगेच फरकही जाणवतो; मात्र दुधातील कॅल्शियममुळे पुन्हा पित्ताशयात अॅसिड तयार होते. त्यामुळे ऍसिडिटी होऊ नये यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. अॅसिडिटी जाणवल्यास कच्च्या बटाट्याचा ज्युस रामबाण ठरतो. तसेच जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, असा सल्लाही या सत्रात डॉक्‍टरांकडून देण्यात आला. सायंकाळी साडेपाच वाजता मॅसिकॉन परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन झाले. सुधीर मोघे यांनी सूत्रसंचालन केले. 
 

जीम सर्वांसाठी नाही 
व्यायाम म्हटले की सर्वांनीच जीममध्ये जाऊन व्यायाम करावा का, असा प्रश्‍न येतो. प्रत्यक्षात आपल्याला एवढ्या जास्त व्यायामाची गरज पडत नाही. रोज पळणे, चालणे, झोपून व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा केली तर ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसह इतर व्याधींवरही सकारात्मक परिणाम दिसतात, असे मत डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com