वसमतमध्ये तीन मुन्नाभाई डॉक्टरांवर कारवाई, वैद्यकीय साहित्य अन् औषधे जप्त | Bogus Doctors In Hingoli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bogus Doctor News

वसमतमध्ये तीन मुन्नाभाई डॉक्टरांवर कारवाई, वैद्यकीय साहित्य अन् औषधे जप्त

वसमत (जि.हिंगोली) : तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टर अवैध व्यवसाय करीत असल्याच्या माहितीवरून तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवार (ता.१६) ग्रामीण भागात संशयित ठिकाणी छापे मारले. यात आरळ, हट्टा व पार्डी खु. येथे बोगस बंगाली डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आले. त्यांच्याकडून वैद्यकीय साहित्य व औषधे जप्त करण्यात आली. तर पार्टी खुर्द येथे गावकऱ्यांनी डॉक्टरांच्या पथकाला घेराव घातला. वसमत तालुक्यात विविध सात ठिकाणी बोगस बंगाली डॉक्टर (Bogus Doctor) अवैध वैद्यकीय व्यावसाय (Medical Profession) करुन नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास मिळाली होती. (Action Against Three Bogus Doctors In Vasmat Taluka Of Hingoli)

हेही वाचा: युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना ममता बॅनर्जींनी दिला धीर,सरकार करणार मदत

त्यावरुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे यांनी कारवाईसाठी पथक नेमले होते. या पथकात डॉ. काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पन्नमवार, डॉ.सिद्दीकी, डॉ.कोठूळे, डॉ.महाजन, डॉ.चिटमोगरेकर, डॉ. जिंतूरकर यासह आरोग्य व पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. या पथकाने तालुक्यातील संशयित सात ठिकाणी भेटी दिल्या. मात्र आरळ, हट्टा व पार्टी खुर्द येथे बोगस बंगाली डॉक्टर अवैध वैद्यकीय व्यावसाय करताना पथकास आढळून आले. पथकाने वैद्यकीय साहित्य व औषधे जप्त केली आहेत. पार्टी खु येथे गावकऱ्यांनी डॉक्टरांच्या पथकाला घेराव घातल्याने थोडा तणाव निर्माण झाला होता. (Hingoli)

हेही वाचा: अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध

मात्र डाॅ. काळे यांनी जमावास समजावून सांगितल्यानंतर शांतता झाली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वसमत (Vasmat) तालुक्यातील बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांनी तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांकडून आपल्या आरोग्याची तपासणी करावी. कुठलेच वैद्यकीय शिक्षण नसलेल्या बोगस डॉक्टरांवर विश्वास ठेऊ नका. असे डॉक्टर हायर अँटिबायोटीक औषधे तसेच स्टेराॅईड वापरत असल्याने त्याचे शरीरावर दुरोगामी घातक परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Action Against Three Bogus Doctors In Vasmat Taluka Of Hingoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HingoliVasmatdoctor