नांदेड : उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कारवाई

nanded
nanded

नांदेड : जिल्ह्यात देशी, हातभट्टी आणि विदेशी दारु विनापरवानगी अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या आरोपींना अटक करून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत काही महिलांसह 23 आरोपींना अटक केली. ही कारवाई उत्पादन शुल्कच्या विशेष पथकांनी जिल्हाभरात मंगळवारी (ता. 2) एकाच वेळी केली.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांच्या मदतीने विविध पथक स्थापन करून अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सज्ज केले. मंगळवारी (ता. 2) दुपारी जिल्हाभरात या पथकांनी देशी दारु, विदेशी, हातभट्टी, ताडी, परराज्यातील दारु साठा करून विक्री करणाऱ्या 23 जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकीसह हातभट्टी व देशी दारु जप्त केली.

किनवट, माहूर, बिलोली, धर्माबाद, देगलूर या भागात या कारवाया केल्या असून अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत. या पथकांनी 115 लीटर देशी दारु, 10 लीटर विदेशी दारु, 45 लीटर बीअर, 146 लिटर हातभट्टी, 167 लीटर ताडी, 72 बॉक्स परराज्यातील विदेशी दारु, 24 बॉक्स बिअर आणि रसायन असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळई दोन आरोपी आपला मुद्देमाल सोडून पसार झाले. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागात 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही अशाच पद्धतीची कारवाई सुरू ठेवून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे निलेश सांगडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com