औरंगाबादमध्ये स्कूल बस विरोधात पुन्हा व्यापक कारवाई

अनिलकुमार जमधडे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : स्कूल बसमध्ये नियमावलीचे उल्लंघन, महिला काळजीवाहक नसणे, या विरोधात मंगळवारी (ता. बारा) आरटीओ कार्यालयातर्फे संपूर्ण शहरात व्यापक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत संपूर्ण आरटीओ अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. 

शहरातील स्कूल बसचा प्रश्‍न गेल्या काही दिवसांमध्ये गंभीर झाला आहे. नियमांचे उल्लंघन करुन सर्रास स्कूल बस चालवल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात स्कूल बसची काच निखळल्याच्या अपघातानंतर आरटीओ कार्यालयाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने स्कूल बस विरोधात मोहिम सुरु केली आहे. चार दिवसापुर्वी पावणेदोनशे बसच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. आज मंगळवारी (ता. 12) शहरातील विविध रस्त्यांवर व्यापक कारवाई करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, श्रीकृष्ण नकाते, शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तैनात करण्यात आली होती. महिला कर्मचारी वगळता आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. स्कूल बस नियमावली 2011 नुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्यक आहे. याशिवाय सर्व नियम पाळले जातात किंवा नाही या अनुषंगाने बसची तपासणी करून कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 25 पेक्षा अधिक स्कूल बस जप्त करण्यात आल्या.

Web Title: Action on school bus in aurangabad