आठ लाखाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त इतवारा पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

नांदेड : राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा नांदेड जिल्ह्यात सर्रास सर्वत्र सहज उपलब्ध होतो. शेजारील राज्यातून लाखोंचा गुटखा गुटखा माफिया आणून विकतात. असाच बाहेरून आलेला जवळपास आठ लाखाचा गुटखा एका मॅक्स पीकअपसह जप्त केला. ही कारवाई इतवारा पोलिसांनी देगलूर नाका भागात मंगळवारी (ता. 13) सायंकाळी चार वाजता केली. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत अन्न व औषध विभागाचा एकही अधिकारी इतवारा ठाण्यात पोहचला नसल्याने पुढील कारवाईसाठी पोलिसांना त्यांची प्रतिक्षा करावी लागली.
शहरातील देगलूर नाका हा भाग अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे.

या भागात गुटखा, जुगार, मटका, लॉटरी, निळे रॉकेल काळ्या बाजारात, स्वस्त धान्य काळ्या बाजारात, देशी दारु, सिंदी यासह सर्वच धंदे जोमाने चालविले जातात. मटका माफिया आणि गुटखा माफियांची भलतीच या भागात चलती आहे. जुना मोंढा, इतवारा, देगलूर नाका, हबीब टॉकीज परिसर, बर्की चौक, होळी, रंगार गल्ली, नावघाट, बिलालनगर, चौफाळा, ब्रम्हपूरी यासह आदी भागात या धंद्यावाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वेळोवेळी पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे आणि टीम या धंद्याविरूध्द कारवाई करतात. परंतु मटका व गुटखा मफियांना राजकिय पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे.

मंगळवारी (ता. 13) सायंकाळी चार वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रोयलावार यांच्या पथकांनी देगलूर नाका भागात (एमएच 37-बी-373) ही मॅक्स पीकअप गाडी थांबवून त्यात असलेला जवळपास आठ लाखाचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेऊन ठाण्यात स्थानबध्द केले आहे. ही माहिती अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सचीन कावळे यांना दिली. मात्र त्यांनी पुढील कारवाईसाठी ठाण्यात जाण्यास टाळाटाळ केली. त्याना प्रत्क्षात पोलिस निरीक्षक श्री. नरवाडे आणि श्री. रोयलावरा यांनी भ्रमध्वनीवरून संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत यात पुढे काय कारवाई झाली याची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Actions of eight lacquoetted gutkha seized police