Adan Dam Water Storage : अडाण धरणात केवळ ५७ टक्के जलसाठा; दारव्हा, कारंजासह ४४ गावांच्या पाणीपुरवठ्याची चिंता

Low Rainfall Affects Dam Water Levels in Washim : दारव्हा, कारंजा लाड शहरांसह तीन तालुक्यांतील ४४ गावांचा पाणीपुरवठा या प्रकल्पावर अवलंबून असल्याने आगामी उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी जलसाठ्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Adan Dam Water Storage

Adan Dam Water Storage

esakal

Updated on: 

वाशीम जिल्ह्यातील अडाण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा अल्प पाऊस झाल्याने तालुक्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अडाण प्रकल्पात केवळ ३८.५६ दलघमी म्हणजेच सुमारे ५७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. दारव्हा व कारंजा लाड शहरांसह तीन तालुक्यांतील ४४ गावांच्या पाणीपुरवठ्याची भिस्त या प्रकल्पावर असल्याने आगामी काळात पाणीटंचाई टाळण्यासाठी आता पासूनच जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अडाण प्रकल्पाची एकूण जलसाठवण क्षमता ७८.३२ दलघमी असून त्यापैकी ६७.२५ दलघमी उपयुक्त आणि ११.०७ दलघमी मृत जलसाठा आहे. यंदा पावसाळा संपत आला तरी धरणात केवळ ३८.५६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचेही नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Adan Dam Water Storage
Solapur E-Bus Service : महापालिकेच्या ई-बस, परिवहन समितीचे चाक रुतलेलेच! दीड महिन्यापासून बस प्रतीक्षेत; सदस्य निवडीचा निर्णय सहा महिन्यांपासून प्रलंबित

अडाण प्रकल्पातून दारव्हा शहरासह तालुक्यातील काही गावांना, नेर तालुक्यातील २२ गावांना तसेच कारंजा लाड शहरासह १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्यासाठी एकूण ११ दलघमी पेक्षा जास्त पाणीसाठा आरक्षित आहे. सध्या उपलब्ध असलेला कमी जलसाठा, आगामी काळातील बाष्पीभवन आणि विविध कारणांमुळे होणारा पाण्याचा उपसा लक्षात घेता आरक्षित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

मागील वर्षी तालुक्यात ८०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदा पावसाळा संपत आला तरी केवळ ४५८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी-नाले आत्तापासूनच कोरडे पडू लागले असून खरीप पिकांवरही पावसाअभावी मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम अडाण प्रकल्पातील जलसाठ्यावर झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्यामुळे अडाण प्रकल्पाच्या कालव्यांसाठी सुधारित १८२ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर कामाला गती मिळाली.

Adan Dam Water Storage
Election Commission: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधादरम्यान ECचा मोठा निर्णय; SIRमध्ये वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी, कशी आहे प्रक्रिया?

सिंचन क्षेत्र वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, धरणात पुरेसा जलसाठ्याअभावी कालव्यांची कामे पूर्ण होवूनही प्रत्यक्ष सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता हा प्रश्न कायम राहणार आहे. अडाण प्रकल्पातील सध्याचा जलसाठा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत सिंचन, पाणीपुरवठा योजना, बाष्पीभवन आणि भविष्यातील पाण्याची गरज यांचा विचार करून जलसाठ्याचे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com