आत्महत्याग्रस्त अभिजीतच्या भावाला आडसकर देणार शिक्षण संस्थेत नोकरी

रामदास साबळे
मंगळवार, 31 जुलै 2018

केज (बीड) : मराठा अरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या अभिजित देशमुख यांच्या भावाला भाजप नेते रमेश आडसकर आपल्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरी देणार आहेत. तर, शासनाकडून दहा लाख रूपये मदत दिली जाणार आहे. 

केज (बीड) : मराठा अरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या अभिजित देशमुख यांच्या भावाला भाजप नेते रमेश आडसकर आपल्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरी देणार आहेत. तर, शासनाकडून दहा लाख रूपये मदत दिली जाणार आहे. 

उच्चशिक्षित अभिजित देशमुख या तरुणाने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्व लिहलेल्या चिट्ठीत मराठा आरक्षण आणि बँकेच्या कर्जाचा उल्लेख केला आहे. दरम्यान, अभिजीतच्या कुटुंबाला शासनाकडून मदतीचे ठोस अस्वासन मिळाल्या शिवाय मृतदेहाची उत्तरीय तपासणी आणि अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. सर्व ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडून बसले होते.

यानंतर, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी 10 लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत प्राधान्याने घेण्याचे लेखी पत्र दिले. तर, भाजप नेते रमेश आडसकर यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत अभिजीतच्या भावाला तत्काळ नोकरीस घेण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या वतीने सभापती संदीप पाटील यांनी ही माहिती उपस्थितांना दिली.

Web Title: adaskar gives job to abhijit s brother in education institute