युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नांदेड दौरा रद्द

प्रल्हाद कांबळे
रविवार, 6 मे 2018

आदित्य ठाकरे हे शिवसेना नेते झाल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी (ता. सहा) विशेष विमानाने या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे दिलीप घुगे यांनी आयोजीत केलेल्या १०१ सामुहीक विवाहसोहळा संपन्न होणार होता.

नांदेड : युवा सेनेचे प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा विमानात तांत्रीक बिघाड झाल्याने अचानक रद्द झाल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे हे शिवसेना नेते झाल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी (ता. सहा) विशेष विमानाने या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे दिलीप घुगे यांनी आयोजीत केलेल्या १०१ सामुहीक विवाहसोहळा संपन्न होणार होता. परंतु काही तांत्रीक अडचणीमुळे ते येऊ शकत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.  

मागील आठ दिवसांपासून शिवसैनिक व पदाधिकारी परिश्रम घेत होते. परंतु रविवारी त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप वरिष्ठांना मिळताच कार्यकर्त्यांचे चेहरे पडले होते.   

Web Title: Aditya Thackeray cancelled Nanded tour