Aditya Thackeray
sakal
औसा - अनेक उद्योजक आणि सरकारच्या जवळच्या लोकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज विशेष बाब म्हणून माफ केले जाते आणि इथे शेतकरी मरत असतांना आणि तो न्याय मागण्यांसाठी उपोषण करीत असतांना नियम, अटी आणि अन्य तांत्रिक बाबीमध्ये अडकवण्याचे षडयंत्र हे सरकार करीत आहे. दुष्काळाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे नाटक करीत आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून त्यांना मदत करण्याची मानसिकता सरकारमध्ये नाही.