Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासनाचे दुष्काळाकडे दुर्लक्ष

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण वाहू लागले असून अधिकाऱ्यासह पदाधिकारी निवडणूक प्रचारात गुंतलेले आहे.
Lok Sabha Election 2024  drought
Lok Sabha Election 2024 droughtSakal

फुलंब्री : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण वाहू लागले असून अधिकाऱ्यासह पदाधिकारी निवडणूक प्रचारात गुंतलेले आहे. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला असून फुलंब्री तालुक्यात यावर्षी दुष्काळाचे संकट वाढले आहे. त्यामुळे निवडणुकीचा रंग माळीत प्रशासनाने दुष्काळाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

फुलंब्री तालुक्यात यावर्षी सुरुवातीलाच पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जेमतेम पाण्यावर पिके तक धरून उभे होती. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले. खरिपात झालेला खर्चही उत्पन्नातून निघला नसल्याने शेतकऱ्यांची अगोदरच कोंडी झाली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वनवन भटकावे लागत होते. काही भागात पंचायत समितीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र अनेक भागातील प्रस्ताव आजही प्रलंबित आहे.

शेतकऱ्याबरोबरच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न यात गंभीर झाला आहे. जनावरांना मुबलक चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची परवड होऊ लागली आहे. शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना जनावराची चिंता सतावू लागली असून चारा पाण्याचा प्रश्न एरणीवर वर आला आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकसभा निवडणूक कामांमध्ये तहसीलसह पंचायत समितीचे अधिकारी गुंतलेले असल्यामुळे त्यामुळे कार्यालय ओस पडले आहे. चारापाण्याचा प्रश्नासाठी ग्रामीण भागातून शेतकरी कार्यालयात येऊ लागले आहे.

मात्र त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. कार्यालयात अधिकारी वेळेवर मिळत नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक कामांत दुष्काळाकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

चारा छावण्या उभारण्याची मागणी

फुलंब्री तालुक्यामध्ये दुष्काळाची दहाकता वाढली असून पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकरी जनावरे विक्री करताना दिसून येत आहे. चाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन वेगवेगळ्या भागात चारा छावण्या उभाराव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यातून होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com