टंचाई उपाय योजनांसाठी प्रशासन सज्‍ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

हिंगोली : जिल्‍ह्‍यात टंचाई उपाय योजनेवर मात करण्यासाठी प्रशासन सज्‍ज असून गावकऱ्यांची पाण्यासाठी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्‍याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत दिली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेस पालकमंत्री कांबळे यांच्‍यासह आमदार तान्‍हाजी मुटकुळे, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर यांची उपस्‍थिती होती. 

यावेळी कांबळे यांनी जिल्‍ह्‍यातील टंचाई उपाय योजनेचा आढावा मांडला. जिल्‍ह्‍यामध्ये सध्याच्‍या स्‍थितीत एकाही टँकरची मागणी नाही. मात्र जानेवारी महिन्यापासून टँकरची मागणी आल्‍यास तातडीने टँकर उपलब्‍ध करून दिले जाईल. मागणीनंतर एका दिवसात टँकर उपलब्‍ध करून देण्याची सूचना प्रशासनाला दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जिल्‍ह्‍यात सध्याच्‍या स्‍थितीत सव्वापाच लाख मेट्रिक टन चारा उपलब्‍ध असून जुलै महिन्यापर्यंत चारा टंचाई निर्माण होणार नाही. मात्र त्‍यानंतरही जिल्‍ह्‍यातून चारा वाहतुकीला बंदी घालण्यात आल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.

जिल्‍ह्‍यात मजुराच्‍या हाताला काम मिळावे यासाठी हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली आहेत. सध्याच्‍या स्‍थितीत दहा हजार मजूर ८८१ कामांवर कार्यरत आहेत. मजुरांची मागणी आल्‍यानंतर तातडीने कामे सुरु करण्याच्‍या सूचना यंत्रणेला देण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

औंढा, वसमत दुष्काळाबाबत लवकरच निर्णय
औंढा व वसमत तालुक्‍यातील गावांमध्ये सर्वेक्षणाच्‍या वेळी असलेली स्‍थिती व आताची स्‍थिती यात मोठी तफावत आहे. त्‍यामुळे या दोन तालुक्‍यात दुष्काळ जाहिर करण्याबाबतचा प्रस्‍ताव पाठवण्याच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाला दिल्‍या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्‍या अध्यक्षतेखाली असलेल्‍या उपसमितीमध्ये या तालुक्‍यातील दुष्काळाबाबत निर्णय घेतला जाणार असल्‍याचे पालकमंत्री श्री. कांबळे यांनी सांगितले

Web Title: Administration is ready for Scarcity Remedy Schemes