प्रवेश पंधरवाड्याने शैक्षणिक सत्रास सुरवात

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी गटशिक्षणाधिकारी यांना ता. १५ जुनपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राची सुरवात प्रवेश पंधरवाड्याने करण्याचे आदेशीत केले आहे. हे आदेश जिल्हा परिषद की खासगी शाळांसाठी आहेत, या बाबत संभ्रमावस्था असून काही खासगी शाळांनी आपल्या शिक्षकांना सोमवारपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शाळा बंद शिक्षण सुरु ठेवण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यातील बहुतांश शाला ऑनलाईन पध्दतीने अध्यापन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर शाळांच्या शैक्षणिक सत्रास ता. १५ जुनपासून सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही, विद्यार्थी शाळेत येणार की नाही, हे अद्यापही शासनाकडून स्पष्ट झालेले नाही. परंतू जिल्हा परिषद प्रशासनाने शैक्षणिक सत्राची सुरुवात प्रवेश पंधरवाड्याचा निर्णयाने केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी (ता.दहा) या संबंधीचे आदेश सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. शैक्षणिक सत्रात ता. १५ जुनपासून सुरवात होत असून दरवर्षी प्रमाणे शाळा पुर्व तयारी म्हणून प्रवेश प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही शाळास्तरावर करण्यात यावी.

शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य 
सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील विशेषतः मुंबई, पुणे येथे कामानिमित्त गेलेले कामगार, कर्माचारी आपल्या मुळ गावी परत आलले आहेत. अशा पालकांच्या मुलांचे प्रवेश करून घ्यावेत, तसेच दर आठवड्यास प्रवेश पंधरवाडा प्रक्रियेचा अहवाल सादर करावा, आरोग्य विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सोमवारपासून प्रवेश पंधरवाडा राबवला जाणार असून त्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे अनिवार्य झाले आहे.

खासगी शाळांमध्ये शिक्षकांना उपस्थितीचे आदेश
जिल्हा परिषद सीईओंनी दिलेल्या या आदेशानुसार काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या शिक्षकांना देखील शाळेत उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळामध्ये विद्यार्थी येणार नाहीत, हे स्पष्ट असले तरी तयारी मात्र सुरु केली आहे. स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी प्रक्रिया देखील राबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

शाळांना निर्णयाचे अधिकार
शैक्षणिक सत्रास १५ जुनपासून सुरुवात होत आहे. खासगी शाळांसाठी शासनस्तरावरून अजून कुठलेही आदेश नाहीत. परंतु शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांना शाळांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. शासनाकडून आदेश आल्यास, त्या प्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- डॉ. वंदना वाव्हुळ
शिक्षणाधिकारी (मा.) परभणी.

 

अद्याप कुठलेही आदेश नाहीत
शासनास्तरावर खासगी शाळांबाबत अद्याप कुठलेही आदेश नाहीत. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश पंधरवाडा राबवला जाणार आहे. यामध्ये परजिल्हा व राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- डॉ. सूचिता पाटेकर
शिक्षणाधिकारी (प्रा.) परभणी.


ऑनलाईन अध्यापन 
शासनाकडून अथवा जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्या संदर्भात अथवा शिक्षकांसाठी अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत. सद्यस्थितीत बहुतांश शाळा व शिक्षक शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करीत आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.
- गणेशराव शिंदे
अध्यक्ष, जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ, परभणी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com