अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पितृशोक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नांदेड- नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. भारती बाई सदावर्ते, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील प्रख्यात विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते व प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ.राजरत्न सदावर्ते यांचे ते वडील होत. मानवी हक्क आयोगाच्या माजी संशोधन अधिकारी अॅड. सौ. जयश्री सदावर्ते पाटील यांचे ते सासरे होते.

एन. यु. सदावर्ते हे प्रभात नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जवळपास 25 वर्षे चेअरमन होते. तत्कालीन नगरपालिकेत त्यांनी दोन वेळा प्रभातनगर वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री स्मृतीशेष द्रोपदाबाई सदावर्ते या निवडून आल्या होत्या. महानगरपालिकेच्या निवडणूकीत सदावर्ते विजयी झाले होते. फुले शाहू आंबेडकर चळवळीत त्यांनी स्वःताला झोकून दिले होते.

एन. यु. सदावर्ते व सौ. भारतीबाई सदावर्ते यांनी धम्म चळवळीत हिरिरीचा सहभाग घेऊन धम्म चळवळ रुजविली आहे. चळवळीतील सर्व सामान्यांना हिम्मत देणारा नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांचा पार्थिव देह सोमेश कॉलनी कलामंदिरच्या पाठीमागे, नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. स्मृतीशेष एन. यु. सदावर्ते यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांची देहदान यात्रा दुपारी दोन वाजता निघणार आहे. त्यांचा पार्थिव देह डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे  सुपुर्त करण्यात येणार आहे.

Web Title: Adv GunaRatna Sadvartes father Passes Away