भविष्यात 600 ते 800 कोटींच्या व्यावसायिक उलाढालीची अपेक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

औरंगाबाद - उद्योगविश्वात नावलौकिक मिळविलेल्या "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो'च्या माध्यमातून आगामी काळात सहाशे ते आठशे कोटींच्या व्यावसायिक उलाढालीची अपेक्षा मसिआच्या सदस्यांनी व्यक्त केली. या चार दिवसांच्या काळात साठ हजारांवर नागरिकांनी भेटी देत उद्योजकांचा उत्साह द्विगुणित केला. शेवटच्या दिवशी रविवारी (ता. आठ) शहरवासीयांनी अलोट गर्दी केली. या गर्दीच्या साक्षीनेच प्रदर्शनाचा समारोप झाला. 

"मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर'तर्फे कलाग्राम येथे चारदिवसीय "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो' आयोजित करण्यात आले होते. "एमटीडीसी'ने कलाग्रामचा परिसर उपलब्ध करून देत यात सहआयोजनाची भूमिका निभावली. गुरुवारी (ता. चार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. रविवारी (ता. आठ) समारोप झाला. उद्योगविश्वाच्या महामेळाव्यामध्ये औरंगाबाद, मराठवाड्यासह राज्यभरातून ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, कृषी, आयटी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इलेक्‍ट्रिकल अशा विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या जोडीला मध्यम आणि नवोदित उद्योजकही मोठ्या हिरिरीने सहभागी झाले आहेत. कलाग्राममधील भव्य मैदान आणि तयार गाळ्यांचा उपयोग करीत 335 स्टॉल्स येथे लावण्यात आले. 

दररोज 15 ते 20 हजार नागरिकांनी या प्रदर्शनास भेटी दिल्या. दोनशेवर व्हीआयपी व्यक्ती या काळात येथे आले. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील उद्योजकांनी यात सहभाग घेतला. यंदा महिला उद्योजकांची उपस्थिती प्रशंसनीय होती. या प्रदर्शनाला उद्योजक, व्यापारी, शेतकरी, उद्योग सुरू करू इच्छिणारे यांच्याबरोबरच अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, विविध शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. 

प्रदर्शनाच्या यशस्वितेकरिता मसिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, उपाध्यक्ष किशोर राठी, प्रदर्शन समन्वयक संतोष कुलकर्णी आणि भारत मोतींगे, प्रसिद्धिप्रमुख अर्जुन गायके, राहुल मोगले, माजी अध्यक्ष संतोष चौधरी, भगवान राऊत, बालाजी शिंदे, सुनील भोसले, सुनील किर्दक, अभय हंचनाळ, नारायण पवार, अब्दुल शेख, मनीष बाफना, कुंदन रेड्डी, फुलचंद जैन, गजानन देशमुख, मनीष अग्रवाल, उदय गिरधारी, प्रसाद मुळे, अनुप काबरा, ज्ञानदेव राजळे, अनिल पाटील, संदीप जोशी, सचिन गायके आदींसह सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. 

Web Title: Advantage Maharashtra Expo