शपथपत्रातील माहिती वृत्तपत्रांतून प्रसिद्ध - सहारिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नांदेड - निवडणुकीच्या वेळी उमेदवाराने दिलेले शपथपत्र मतदान केंद्र परिसरात नोटीस फलकावर लावण्यासह वृत्तपत्रांतही प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांच्या शपथपत्राची मतदारांना माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नांदेड, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उमेदवारांच्या शपथपत्रातील माहिती मतदारांना देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे. मतदारांना माहिती व्हावी यासाठी शपथपत्रातील माहितीचा गोषवारा वृत्तपत्रांतून, तसेच मतदान केंद्र परिसरात नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

Web Title: affidavit information published in newspapers