विश्रांतीनंतर नांदेडला सर्वत्र पाऊस

कृष्णा जोमेगावकर
रविवार, 12 ऑगस्ट 2018

दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला अाहे.

नांदेड : जिल्ह्यात दिर्घ विश्रांतीनंतर शनिवारी (ता. ११) सायंकाळी पावसाचे आगमण झाले. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात झाला. रेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचे सर्वाधिक प्रमाण धर्माबाद तालुक्यात ६६.३३ मिलीमिटर तर किनवट मंडळात ९६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टी नाेंद झाली. दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला अाहे. रविवारी (ता. १२) आठ वाजता संपलेल्या चोविस तासांत एकूण ४३८.०३ मिलीमीटर नुसार सरासरी २७.३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.    

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: After rest Nanded has rain everywhere