दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणीत पुन्हा संततधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सोमवारी (ता. 20) देखील सुरुच आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाच्या वार्षिक सरासरीचा निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे.

परभणी- दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सोमवारी (ता. 20) देखील सुरुच आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाच्या वार्षिक सरासरीचा निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी मात्र रात्री नऊ वाजता जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्रभर रिमझिम पाऊस सुरु राहिला. सोमवारी पहाटे काही वेळ पाऊस थांबल्यानंतर पुन्हा 11 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

सध्या कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस सुरु झाला आहे. जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी 774.62 मिलीमिटर असून सोमवार (ता.20) पर्यंत 392.75 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. एकुण 50.7 टक्के सरासरी पाऊस झाला आहे.

Web Title: After two days of rest, again raining in Parbhani