दोन महिन्यानंतर बाजारपेठ फुलली

Hingoli market
Hingoli market

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली बहुतांश दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळात नियमित सुरू करण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, सायंकाळी सात ते सकाळी सात यावेळात संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी राहणार असल्याचे आदेशही श्री. जयवंशी यांनी काढले आहेत. 

प्रतिबंधमुक्‍त दुकानांसह क्रीडा संकुल, क्रीडा मैदान व इतर सार्वजनिक खुली मैदाने वैयक्‍तीक व्यायामासाठी सुरू राहणार आहेत. येथे प्रेक्षक व सामूदायिक कार्यक्रमासाठी मात्र बंदी असणार आहे. तसेच खासगी व सार्वजनिक वाहतूक करताना दुचाकी वाहन केवळ एका व्यक्‍तीसाठी, तीन चाकी वाहन एक अधिक दोन अशा तीन व्यक्‍तींसाठी, चारचाकी वाहन एक अधिक दोन अशा तीन व्यक्तींसाठी वापरता येणार आहे.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरू 

बस वाहतूक सेवा प्रति बस वाहन क्षमता पन्नास टक्‍क्‍यापर्यंतच्या मर्यादीत सामाजिक अंतराचे पालन व सॅनिटायझरचा वापर करून सुरू करता येणार आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधील गावे व भाग वगळून जिल्‍ह्यातील सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय, अस्‍थापना दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळात सुरू ठेवता येणार आहेत. 

रात्री संपूर्ण जिल्‍ह्यात संचारबंदी 

तर रात्री सात ते सकाळी सात यावेळात संपूर्ण जिल्‍ह्यात संचारबंदी लागू राहणार आहे. दुकाने सुरू करताना मालक, ग्राहक, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्‍क असणे बंधनकारक केले आहे. सार्वनिक ठिकाणी तसेच दुकानाच्या परिसरात मद्यपान, तंबाखू, गुटखा, पान आदीच्या सेवनास प्रतिबंध करण्यात आले आहे. 

डिजीटलवर भर देण्याचा प्रयत्न
 
दुकानात पाच पेक्षा जास्‍त ग्राहकास एका वेळेस प्रवेश देण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. दुकानाबाहेर एक मीटर अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी गोल, चौकोन आखावे लागणार आहेत. ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशाची देवाण घेवाण करताना डिजीटलवर भर द्यावा, असे सांगण्यात आले आहे.

दोन महिन्यानंतर कापड दुकाने सुरू

 दरम्यान, ऑनलाइन शिकवणीसाठी परवानगी राहणार आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आरोग्य, पोलिस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी अडकून पडलेले व्यक्‍ती, पर्यटक, अलगीकरण केंद्रात सुरू असलेल्या सेवा व बसस्‍थानक, रेल्‍वे स्‍थानकावरील हॉटेल सेवा सुरू राहतील, हॉटेल, रेस्‍टॉरंट व खानावळ यांच्या सेवा फक्‍त घरपोच वितरणासाठी सुरू ठेवता येतील. दोन महिन्यानंतर कापड विक्री, रेडीमेड कापड विक्री दुकाने सुरू झाल्याने  दुकानदारांतून समाधान व्यक्त केले जात होते. 

हॉटेल, रेस्‍टॉरंट, आदरातिथ्य सेवा बंद राहणार 

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍था, कोचिंग क्‍लासेस, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत. हॉटेल, रेस्‍टॉरंट व आदरातीथ्य सेवांना परवानगी दिली नाही. तसेच सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा विषयक, करमणूक विषयक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक व मोठ्या प्रमाणात नगरिक एकत्र येऊन साजरे होणारे कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक व प्रार्थना स्‍थळे सर्व नागरिकांसाठी व कार्यक्रमांसाठी बंद राहतील, असे आदेश श्री. जयवंशी यांनी काढले आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com